अखेर टोमॅटो बाबाचं दुकान बंद

December 5, 2014 6:17 PM2 commentsViews:

pune tomato baba05 डिसेंबर : ‘टोमॅटो ज्युस प्या आणि बरे व्हा’ असं थोतांड पसरवणार्‍या टोमॅटो बाबांचं दुकान आता बंद झालंय. नितीन महाराज असं या बाबाचं नाव होतं. टोमॅटोचा ज्युस पिऊन सर्व आजार बरे होतात असं सांगून  सगळ्यांना टोमॅटोचा रस पाजत होता. IBN लोकमतनं या बाबाचा पर्दाफाश केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं याबाबत तक्रार केली होती. अखेरीस खडबडू जागे झालेल्या प्रशासनाने याची दखल घेत बाबाचा गाशा गुंडाळला.

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे फिरंगाईमाता मंदिराजवळ टोमॅटो ज्यूस प्यायल्यानं व्याधी बर्‍या होतात, अशी अंधश्रद्धा पसरवणारा नितीन थोरात महाराज याचं 3 वर्षापासून हे दुकान सुरू होतं. अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या या बाबाकडून मिळणारा टोमॅटो ज्यूस पिण्यासाठी मोठी गर्दी या परिसरात होतं होती. आयबीएन लोकमतने या प्रकारणाचा पर्दाफाश केल्यानंतर प्रशासनाला जाग आली.
नितीन महाराज देत असलेल्या टोमॅटो ज्यूसचे नमुने आणि औषध प्रशासनानं गोळा केले. अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकार्‍यांनी नितीन महाराज थोरात यांची भेट घेतली तेव्हा ते कोणती वनस्पती वापरतात त्याचं नावंही सांगू शकले नाहीत. अन्न विभागाच्या अहवालात टोमॅटो ज्यूस असल्याचं आढळून आलंय.

हा ज्यूस अमृत रस म्हणून वेगवेगळ्या व्यादींवर उपाय म्हणून मोफत वाटला जातोय असं या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आलंय. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस खातं खडबडून जागं झालंय. पोलिसांनी या भोंदूबाबाची चौकशी केली. नवीन जादुटोणा कायद्यानुसार कारवाई करता येते का याबाबत वकिलांचा सल्ला घेण्यात आला पण अजून या बाबावर कारवाई झालेली नाही. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याबाबत तक्रार केली होती. अखेरीस खडबडू जागे झालेल्या प्रशासनाने या बाबाचं दुकान बंद केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Jaising Gadekar

    हिंदू धर्माला बदनाम करणा-या या भोंदू बाबाचे दुकान बंद झाले हे चांगले झाले,पण कोणत्याही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्याने या बाबाविरुद्ध ब्र शब्द काढला नाही याची चीड मनात कायम राहील.

  • Kiran

    It is a game of DR lobby……we have exp this juice & yes it is working……he was not charging a single rupee……..”kuch logo k pet main dard hone laga…dhanda jo band ho raha tha……lootne ka…..

close