वेगळ्या विदर्भासाठी लोकसभेत विदर्भवादी खासदाराचा प्रयत्न

December 5, 2014 9:12 PM2 commentsViews:

ashok_nete05 डिसेंबर : एकीकडे शिवसेना आणि भाजप यांचं संयुक्त सरकारचा मुंबईत शपथविधी सुरू होता. तर दुसरीकडे दिल्लीत मात्र सेना-भाजपच्या कळीच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक भूमिका घेण्याच्या प्रयत्नात होती. हा मुद्दा होता अर्थातच स्वतंत्र विदर्भाचा. गडचिरोलीचे भाजपचे खासदार अशोक नेते यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी लोकसभेमध्ये खाजगी विधेयक आणलं होतं. पण आज वेगवेगळ्या विषयावर चर्चा लांबलेली असल्यामुळे हे खाजगी विधेयक चर्चेसाठी येऊ शकलं नाही.

सत्तेत आल्यावर ‘वेगळा विदर्भ करणार’ अशी जाहीर कबुली भाजपच्या नेत्यांनी दिली होती. एव्हान सत्तेत आल्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भाजपची पॉलिसीच आहे असं स्पष्ट केलं होतं. पण आता वेगळ्या विदर्भासाठी भाजपच्या नेत्यांनी हालचाल सुरू केलीये. गडचिरोलीचे भाजपचे खासदार अशोक नेते यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी लोकसभेमध्ये खाजगी विधेयक आणलं होतं. यामध्ये बुलढाणापासून ते गडचिरोलीपर्यंतच्या स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली होती. पण लोकसभेमध्ये आज वेगवेगळ्या विषयावर चर्चा लांबलेली असल्यामुळे हे खाजगी विधेयक चर्चेसाठी येऊ शकलं नाही. अशोक नेते यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना मात्र हे विधेयक पुढच्या अधिवेशनामध्ये आणणार आहोत. आणि स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लावून धरणार आहोत असं सांगितलं. तर आजच मंत्रिपदाची शपथ घेणार भाजपचे नवे राज्यमंत्री अंबरिश अत्राम यांनीही याबद्दल स्पष्ट संकेत दिले. आमच्या तीन पिढ्या वेगळ्या विदर्भ राज्यासाठी लढल्या आहेत. आम्ही आमच्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर ठाम आहोत, असं अंबरिश अत्राम यांनी म्हटलंय. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असं म्हणत राज्याच्या सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेचं भाजपच्या या दिल्लीतल्या पवित्र्यावर काय म्हणणं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • SHAMAL

    KASHALA PAHIJE HYANA VEGALA VIDHARBHA ATA YANCHE 45 KHASDAR VIDHRABHATUN NOVADUN ALET TYANA SANGA VIDHARBHACHA VIKAS KARAYALA SWATAHACHE KHISE BHARU NAKA

  • Sham Dhumal

    विदर्भ वेगळा करण्यापेक्षा विदर्भाचा विकास करणे आवश्यक आहे.

close