हाफीजने पुन्हा गरळ ओकली,’…अन्यथा भारताविरुद्ध जिहाद पुकारू’

December 5, 2014 9:54 PM0 commentsViews:

hafiz saied05 डिसेंबर : काश्मीरचा प्रश्न त्वरित सोडवला पाहिजे नाहीतर भारताविरुद्ध जिहाद सुरू ठेवू अशी उघडउघड धमकी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदने याने दिलीय. जम्मू काश्मीरमध्ये आज हे हल्ले झाले आणि याच काळात हाफीज सईदने लाहोरमध्ये दोन दिवसांची परिषद घेतली होती. त्याने गरळ ओकत नाही तेच काश्मीरमध्ये हल्ले झाले आहे.

लाहोरमध्ये मिनार ए-पाकिस्तानामध्ये झालेल्या रॅलीत हाफीजने काश्मीरमध्ये होणार्‍या निवडणुकीविरोधात भडकाऊ भाषण केलं होतं.
जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचे हजारो कार्यकर्ते या परिषेदला जमले होते. या परिषदेची पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात आली होती. एवढंच नाहीतर यासाठी पाकमध्ये खास ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. या अगोदरही हाफीजने भारताला उघड उघड धमकी दिली होती. 26/11 हल्यातील मास्टर माईंड असल्या हाफीज भारताच्या हिटलिस्टवर आहे तसंच अमेरिकेनंही त्याच्यावर 1 कोटीचं बक्षीस जाहीर केलंय. पण अजूनही पाकमध्ये हाफीज लपून बसला असून त्याला पाकिस्तान अभय देत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close