मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला यशवंतराव चव्हाण यांचं नाव

July 8, 2009 11:35 AM0 commentsViews: 20

8 जुलै मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. वांद्रे-वरळी सी लिंकच्या नामकरणासंबंधी अधिसूचना काढण्याची चर्चा सुरू होती. त्याचा निर्णय संबंधित विभागानं घ्यावा असंही ठरवण्यात आलं. त्याचवेळी अचानक एमएसआरडीसीने एक्सप्रेसवेला यशवंतराव चव्हाणांचं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावावर लगेच चर्चा होऊन मंत्रिमंडळानं बहुमताने हा निर्णय घाई-घाईत मंजूर केला. या एक्सप्रेसवेला पु.ल. देशपांडेंचं नाव देण्याची शिवसेनेची मागणी होती. तसा निर्णयही युती सरकारच्या काळात घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र सत्तापालट झाला आणि हा निर्णय बारगळला. आता यशवंतराव चव्हाणांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. बुधवारी दुपारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर किवळे गावाजवळ शिवसेनेनं आंदोलन केलं आहे. हायवेला पु. ल. देशपांडे यांचं नाव देण्याची मागणी करत शिवसैनिकांनी हे आंदोलन केलंय. यावेळी पु. ल. देशपांडे महामार्ग असा फलकही सेनेनं फडकावला.

close