मित्रपक्षांसाठी पुन्हा विस्तार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

December 5, 2014 10:39 PM0 commentsViews:

cm_on_rpi3405 डिसेंबर : लवकरच मंत्रिमंडळाचा पुन्हा एकदा विस्तार होईल. त्यात मित्रपक्षही सहभागी होतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

आज शिवसेनाच्या 10 आणि भाजपच्या 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण युती तुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या घटकपक्षांना खातेवाटपात ठेंगा दाखवण्यात आलाय. रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांना मंत्रिमंडळात समावेशाचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात जागा न देण्यात आल्यामुळे राजू शेट्टी, महादेव जानकर यांनी शपथविधीकडे पाठ फिरवली. फक्त रामदास आठवले या शपथविधीला उपस्थित होते. त्यामुळे आता घटकपक्षांचा मान राखण्यासाठी फडणवीस यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं आश्वासन दिलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close