शरद पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया

December 6, 2014 1:13 PM0 commentsViews:

pawar_on_congress06 डिसेंबर : दिल्लीतील घरी पाय घसरून पडल्यामुळे पायाला दुखापत झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलीये. शुक्रवारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर हिप रिपलेसमेंट यशस्वी सर्जरी  करण्यात आली आहे. पवारांची प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

सर्जरी झाल्यामुळे पुढच्या आठवड्यापर्यंत पवारांना रुग्णालयातच ठेवणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पण त्यांना नेहमीसारखं हिंडण्याफिरण्यासाठी चार ते सहा आठवड्यंाचा कालावधी लागू शकतो असंही डॉक्टरांनी सांगितलंय. तीन दिवसांपूर्वी दिल्लीतील घरी शरद पवार पाय घसरून पडले होते. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचं निदान झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close