‘त्या’ दहशतवाद्यांकडे सापडली पाकिस्तानी फूड पॅकेट

December 6, 2014 1:30 PM0 commentsViews:

jammu and kashmir terror attack06 डिसेंबर : काश्मीर खोरं शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याने हादरलं आता या हल्ल्याचे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. अतिरेकी इथं मोठा घातपात करण्याच्या तयारीने आल्याचं उघड झालंय. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी फूड पॅकेट सापडली होती. तशीच पॅकेट या अतिरेक्यांकडे सापडलीये. या हल्ल्यामागे मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंट हाफीज सईदचा हात असल्याचा संशय बळावलाय.

जम्मू आणि काश्मीरच्या उरवी भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी दिवसभरात 3 हल्ले केले होते. उरवी भागात सहा दहशतवाद्यांनी घुसखोरी करून जवानांच्या चौकीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सहाही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलंय. जे 6 अतिरेकी मारले गेले त्यांचे आणि त्यांच्या काही सामानाचे फोटोज नेटवर्क 18च्या हाती लागले आहेत. या दहशतवाद्यांकडे काही फूड पॅकेट्स सापडली आहेत आणि त्यावर ऊर्दू भाषेतली लेबल्स आहेत. याशिवाय या अतिरेक्यांकडे पाकिस्तानात विकल्या जाणार्‍या ब्रॅण्डची बिस्किट्स, ड्रायफ्रूटसही सापडलेली आहेत. 26/11ला मुंबईवर दहशतवादी हल्ला करणार्‍या अतिरेक्यांकडेही याच प्रकारच्या गोष्टी सापडल्या होत्या. या भागाची पाहणी करण्यासाठी लष्करप्रमुख काश्मीरमध्ये पोहचले आहेत. काल शहीद झालेल्या जवानांच्या पार्थिवावर ते पुष्पचक्र अर्पण करतील. उरी भागालाही ते भेट देणार आहेत. जम्मू काश्मीरमधल्या निवडणुकांमध्ये विघ्न आणण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचं भारताने स्पष्ट केलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close