खातेवाटप जाहीर, सेनेकडे उद्योग तर भाजपचं जैसे थे !

December 6, 2014 3:18 PM0 commentsViews:

uddhav and fadanvis_new06 डिसेंबर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता मंत्रिमंडळात 18 कॅबिनेट मंत्री आणि 12 राज्यमंत्री आहेत. त्यानुसार या तीस मंत्र्यांचं नव्यानं खातेवाटप जाहीर करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे नगरविकास आणि सामान्य प्रशासन खात्याबरोबरच महत्त्वाचं गृहखातं देखील ठेवलंय. तर ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल आणि कृषी खातं आणि उत्पादन शुल्क ही खाती कायम ठेवण्यात आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे भाजपनं स्वत:कडचं उद्योग खात शिवसेनेच्या सुभाष देसाई यांच्याकडे दिलंय तर प्रकाश मेहता यांच्याकडे गृहनिर्माण आणि कामगार खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

तसंच गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा खात्याची मोठी जबाबदारी देण्यात आलीय तर गिरीश बापट यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन आणि संसदीय कार्य ही महत्त्वाची खाती देण्यात आलीय. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेलस उद्योग खात्याबरोबरच आरोग्य, परिवहन, पर्यावरण, एमएसआरडीसी या खात्यांची जबाबदारी देण्यात आलीय. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी गटांच्या मर्जीतल्या लोकांवर विश्वास दाखवण्यात आलाय. हिवाळी अधिवेशनानंतर होणार्‍या विस्तारात आणखी पाच ते सहा मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाचं नवं खातेवाटप जाहीर

कॅबिनेटचं खातेवाटप

- गिरीष बापट – अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य
– गिरीष महाजन – जलसंपदा
– दिवाकर रावते – परिवहन
– सुभाष देसाई – उद्योग
– रामदास कदम – पर्यावरण
– एकनाथ शिंदे – सार्वजिनक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
– चंद्रशेखर बावनकुळे – ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा
– बबनराव लोणीकर – पाणी पुरवठा व स्वच्छता
– डॉ. दीपक सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
– राजकुमार बडोले – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

राज्यमंत्री – खातेवाटप

- राम शिंदे – गृह (ग्रामीण)
– विजय देशमुख – सार्वजनिक बांधकाम, परिवहन, कामगार, वस्त्रोद्योग
– संजय राठोड – महसूल
– दादाजी भुसे – सहकार
– विजय शिवतारे – जलसंपदा व जलसंधारण
– दीपक केसरकर – वित्त, ग्रामविकास
– अंबरीश अत्राम – आदिवसी विकास
– रविंद्र वायकर – गृनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण
– डॉ. रणजित पाटील – गृह (शहरे)
– प्रवीण पोटे – उद्योग, खनिकर्म, पर्यावरण

आधीच्या मंत्र्याची खाती कायम
– विष्णू सावरा – आदिवासी विकास
– प्रकाश मेहता – गृहनिर्माण
– मुख्यमंत्र्यांनी गृह खातं स्वतःकडेच ठेवलंय.
– एकनाथ खडसे – महसूल, अल्पसंख्यांक कल्याण
– मुनगंटीवार- वित्त, नियोजन, वने
– विनोद तावडे – शिक्षण
– चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम, सहकार
– पंकजा मुंडे – ग्रामविकास, महिला बाल कल्याण

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close