डीजीसीएचा स्पाईसजेटला दणका, कर्मचार्‍यांचे थकीत पगार देण्याचे आदेश

December 6, 2014 3:48 PM0 commentsViews:

spicejet06 डिसेंबर : किंगफिशर एअरलाईन्स पाठोपाठ आता स्पाईसजेटलाही घरघर लागलीये. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)ने स्पाईसजेट एअरलाईन्सवर कारवाई केलीय. स्पाईसजेटला देण्यात आलेले 186 उड्डाणासाठीच्या वेळा काढून घेण्यात आल्यात. तसंच कर्मचार्‍यांचे थकीत पगार देण्याचे आदेश देण्यात आले आहे. एवढंच नाहीतर खोळंबलेल्या ग्राहकांचे पैसेही 30 दिवसांत परत करण्याच्या सूचना केल्या आहेत.

किंगफिशर एअरलाईन्स डबघाईला आल्यानंतर आघाडीची असलेली स्पाईसजेटही याच पंक्तीत बसण्याची शक्यता आहे. स्पाईसजेटने कर्मचार्‍यांचे पगार थकवले आहे. एवढंच नाहीतर गेल्या काही महिन्यांत अनेक फ्लाईटस् रद्द केल्या आहेत. डीजीसीएने कारवाईचा बडगा उगारात स्पाईसजेटला जमिनीवर आणले आहे. स्पाईसजेटला देण्यात आलेले 186 उड्डाणासाठीच्या वेळा काढून घेण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये स्पाईसजेटच्या अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या होत्या. गेल्या 30 दिवसांत ज्या ज्या फ्लाईट्स रद्द झाल्या त्या ग्राहकांना त्यांचे पैसे परत द्यावेत आणि स्पाईसजेटच्या सर्व कर्मचार्‍यांचे थकलेले सगळे पगार पुढच्या 10 दिवसांत देण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत. पुढच्या एक महिन्यासाठी कोणतीही फ्लाईट बुकिंग्स घेऊ नयेत असंही स्पाईसजेटला बजावण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close