‘मार्ड’ चा संप सुरुच

July 8, 2009 12:08 PM0 commentsViews: 5

8 जुलै स्टायपेंड वाढीच्या मागणीसाठी राज्यातले निवासी डॉक्टर मंगळवारी संध्याकाळपासून संपावर गेले आहेत. निवासी डॉक्टरांना सध्या 15 हजार रुपये वेतन देण्यात येतं, ते वाढवून इतर राज्यांप्रमाणे 30 ते 40 हजार रुपये करावे अशी मागणी करत 'मार्ड' या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं बेमुदत संप पुकारला आहे. मार्डच्या संपात बुधवारी आणखी भर पडली आहे, ती 'मॅग्मो'च्या संपाची. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातल्या सरकारी डॉक्टरांच्या या संघटनेने बुधवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. या दोन्ही संपाचा मोठा फटका पेशंट्सना बसला. मंगळवारी दुपारी राज्य सरकारसोबत झालेली मार्डच्या प्रतिनिधींची बैठक फिस्कटली होती. त्यानंतर संध्याकाळी मार्डच्या बैठकीत संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात सध्या 4 हजार 500 निवासी डॉक्टर विविध हॉस्पिटलमध्ये काम करतात. राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर गेल्याने बुधवारी होणारी शेकडो ऑपरेशन्स रद्द करण्यात आली. फक्त इमर्जन्सी ऑपरेशन्स केली जातील असं सांगण्यात आलं. हॉस्पिटलमधील ज्येष्ठ डॉक्टर्स बुधवारी इमर्जन्सी सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये होते. निवासी डॉक्टर नसल्याने यापुढे मुंबईमधली हॉस्पिटल सेवा कोलमडून शकते. हॉस्पिटल्सच्या ओपीडी बुधवारी बंद ठेवण्यात आल्या. राज्यभरातून मुंबईत ऑपरेशनसाठी येणा-यांचीही बुधवारी निराशा झाली. मुंबईतल्या काही हॉस्पिटल्सच्या डीननी दिलेल्या माहितीनुसार केईएम मधील 190 ऑपरेशन्स रद्द केली गेली. तर नायर हॉस्पिटलमधली 80 ऑपरेशन्स रद्द करण्यात आली. सायन हॉस्पिटलमधली 70 ऑपरेशन्सही रद्द करावी लागली. संप बेमुदत असल्याने वैद्यकीय आवश्यकता वाटल्यास या ऑपरेशन्सपैकी फक्त अति तातडीची ऑपरेशन्स केली जाणार आहेत. पुण्यात मात्र मार्ड च्या डॉक्टरांमध्ये फुट पडली आहे. ससुन मधील 125 निवासी डॉक्टरांनी या संपात सहभाग न घेतल्याने या संपाचा कोणताही फटका पुण्यात बसला नाही. तिथली वैद्यकीय सुविधा सुरळीत चालू होती. ज्या स्टायपेंड वाढीसाठी निवासी डॉक्टरांनी हा संप केला आहे, त्या पगाराच्या तफावतीवर एक नजरदिल्ली (ALLMS) – 47 हजारदिल्ली (REST) – 45 हजारजि.प.म.र – 39 हजारपाँडेचेरी – 34 हजारहरियाणा – 31 हजार 450मध्यप्रदेश – 38 हजारनिमहान्स – 42 हजाररांची – 30 हजारटाटा हॉस्पिटल – 33 हजारमहाराष्ट्रातली परिस्थितीज्युनिअर निवासी डॉक्टर – 15 हजारसीनियर निवासी डॉक्टर – 18 हजार

close