चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

December 6, 2014 12:58 PM0 commentsViews:

chaitabhoomi06 डिसेंबर :  आज महापरिनिर्वाण दिन…दलितांचा कैवारी, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर लोटलाय. आपल्या या महामानवाला श्रद्धाजंली अर्पण करण्यासाठी देशभरातून आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहे.

हातात निळे झेंडे घेऊन चिमुरड्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हजारो लोक मुंबईतल्या आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे शिवाजीपार्कवर आंबडेकर अनुयायी एकत्र आले आहे. मध्यरात्रीपासून देशभरातून अनुयायी दाखल झाले. सकाळपासून लाखो अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊन महामानवाला अभिवादन केलं. तसंच अनेक राजकीय नेत्यांनीही हजेरी लावून बाबासाहेबांना वंदन केलं. यंदा पहिल्यांदाच शासनाकडून बाबासाहेबांना शासकीय मानवंदना देण्यात आली. सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी येत्या 14 एप्रिलला इंदूमिलमध्ये बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपुजन करणार अशी महत्वाची घोषणा केली.

बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करणार्‍यासाठी देशभरातून आलेल्या अनुयायांनी रांगा लावल्या असून महापालिकेने आंबेडकरी अनुयायांच्या सुविधेसाठी सर्वप्रकारच्या व्यवस्था केल्या आहेत. तसंच चैत्यभूमी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबईपाठोपाठ नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुण्यातही आदरांजली वाहण्यात येत आहे. मुंबईत दादरला चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर लोटलाय. तर नागपुरात दीक्षाभूमीवरही बाबासाहेबांना वंदन करण्यात आलं. औरंगाबादमध्येही अभिवादनासाठी विविध कार्यक्रम करण्यात आले आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close