अशी आहे युती सरकारची नवी टीम !

December 6, 2014 4:40 PM0 commentsViews:

team_bjp_and_shisena_goverment06 डिसेंबर : शिवसेना आणि भाजपच्या संसाराला सुरूवात झालीये. शुक्रवारी शपथविधी सोहळा पार पडला. त्यावेळी भाजपच्या 10 आणि सेनेच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. आज दुसर्‍या दिवशी युती सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडील गृहखात्यासह सर्व खाती स्वत:कडेच ठेवली आहे. तर सेनेकडे बांधकाम आणि उद्योग खातं सोपवण्यात आलंय. कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती देण्यात आली याची ही यादी….

कॅबिनेटचं खातेवाटप

- गिरीष बापट – अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य
– गिरीष महाजन – जलसंपदा
– दिवाकर रावते – परिवहन
– सुभाष देसाई – उद्योग
– रामदास कदम – पर्यावरण
– एकनाथ शिंदे – सार्वजिनक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
– चंद्रशेखर बावनकुळे – ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा
– बबनराव लोणीकर – पाणी पुरवठा व स्वच्छता
– डॉ. दीपक सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
– राजकुमार बडोले – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

राज्यमंत्री – खातेवाटप

- राम शिंदे – गृह (ग्रामीण)
– विजय देशमुख – सार्वजनिक बांधकाम, परिवहन, कामगार, वस्त्रोद्योग
– संजय राठोड – महसूल
– दादाजी भुसे – सहकार
– विजय शिवतारे – जलसंपदा व जलसंधारण
– दीपक केसरकर – वित्त, ग्रामविकास
– अंबरीश अत्राम – आदिवसी विकास
– रविंद्र वायकर – गृनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण
– डॉ. रणजित पाटील – गृह (शहरे)
– प्रवीण पोटे – उद्योग, खनिकर्म, पर्यावरण

आधीच्या मंत्र्याची खाती कायम
– विष्णू सावरा – आदिवासी विकास
– प्रकाश मेहता – गृहनिर्माण
– मुख्यमंत्र्यांनी गृह खातं स्वतःकडेच ठेवलंय.
– एकनाथ खडसे – महसूल, अल्पसंख्यांक कल्याण
– मुनगंटीवार- वित्त, नियोजन, वने
– विनोद तावडे – शिक्षण
– चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम, सहकार
– पंकजा मुंडे – ग्रामविकास, महिला बाल कल्याण
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close