अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा

December 6, 2014 6:53 PM0 commentsViews:

cong_on_nag06 डिसेंबर : विधानसभेचं हिवाळी अधिवेशन वादळी होणार याची चिन्ह आताच दिसू लागली आहेत. आधीच नैसर्गिक संकटांनी कोलमडून पडलेल्या शेतकर्‍यांना आर्थिक पॅकेज आणि दलित अत्याचारांना रोखण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सोमवारी नागपुरात विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढणार आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता दीक्षाभूमीवरून हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठोरे, विधानसभेतील गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह प्रमुख नेते आणि आमदार सहभागी होणार आहेत.

काँग्रेसने शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी योजना, कापसाला 5 हजार 500 ते 6 हजार रूपयांचा भाव, सोयाबीन व धान उत्पादक तसंच बागायतदारांना नुकसानभरपाई, ऊस उत्पादकांना योग्य भाव या मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांसह राज्यातील दलित अत्याचारांना आळा घालण्याच्या मागणीसाठी हा हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close