चहापानाला CM उपस्थित नसणे हा विरोधकांचा अपमान-पवार

December 6, 2014 7:38 PM0 commentsViews:

ajit_pawar_vs_cmfadanvis06 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चहापानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री चहापानाला हजर नसणे हा विरोधकांचा अपमान आहे अशी जळजळीत टीका पवारांनी केली.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित राहायचं आहे, आणि त्यामुळे मुख्यमंत्री चहापानाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे चहापानाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित नसणं हा विरोधकांचा अपमान असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. राज्याच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय की चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजर नसतील, असंही पवार म्हणाले. विशेष म्हणजे शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी आपोआप बाजूला सारली गेलीये. राष्ट्रवादीने विरोधीबाकावर दावा केलाय. पण अजून अधिवेशनात विरोधापक्षनेतेपदाचा निर्णय होण्याचा बाकी आहे त्याअगोदरच पवारांनी विरोधकाच्या भूमिका निभवण्यास सुरूवात केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close