विरोधीपक्षनेतेपदी कोण ?; आबा आजारी, दादा-भुजबळांचं नाव चर्चेत

December 7, 2014 12:31 PM0 commentsViews:

ajit pawar on bhujbal07 डिसेंबर : राष्ट्रवादीमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेच्या पदांसंदर्भात संभ्रम निर्माण झालाय. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा दावा करणारं पत्र राष्ट्रवादी, अध्यक्षांना देणार आहे आणि त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लावायची हे ठरणार आहे.

पण आजारी असणार्‍या  आर.आर.पाटील यांच्या ऐवजी विरोधी पक्षनेतेपदी दुसर्‍या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार , छगन भुजबळ , जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची नावं चर्चेत आहेत.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सुनील तटकरे यांना आग्रह होतोय पण तटकरे द्विधा मनस्थितीत आहेत. अनपेक्षितरित्या धनंजय मुंडे यांचं नावं चर्चेत आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी रामराजे निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक आहे, त्यांनी राजीनामा दिला नाही तर राष्ट्रवादीकडून अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close