युती सरकारची उद्यापासून कसोटी

December 7, 2014 12:59 PM0 commentsViews:

yuti_sarkar_235207 डिसेंबर : उद्या सोमवारी राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होतंय. खर्‍या अर्थानं देवेंद्र फडणवीस सरकारचं नियमित कामकाजाचं पहिले अधिवेशन असणार आहे. शिवसेना सत्तेत सामिल झाल्यामुळे सरकार भक्कम जरी झालं असलं तरी दुष्काळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि राज्य सरकारवर कर्जाचं डोंगर यामुळे फडणवीस सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे.

15 वर्षांच्या तपानंतर भाजप सत्तेवर विराजमान झालंय. पण सुरुवातील सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली. निवडणुकीच्या रिंगणात ज्यांच्यावर टीका केली त्यांचाच पाठिंबा घेतल्यामुळे भाजपवर टीकेचा भडीमार झाला. त्यातच जवखेड प्रकरण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, भीषण दुष्काळाची परिस्थिती, राज्यावर कर्जाचा डोंगर, एलबीटी यामुळे सरकारपुढे आव्हानांचा डोंगर उभा ठाकलाय. अशातच राष्ट्रवादीचा पाठिंबा हा भाजपला डोईजड झाला. अखेरीस भाजपने शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. भाजपचा निर्णय शिवसेनेनंही कोणताही पर्याय नसल्यामुळे निमुटपणे मान्य केला. आणि सेना सत्तेत सहभागी झाली. सेनेच्या सहभागामुळे भाजप सरकार स्थिरावले आहे. युती सरकारचं पहिलं कामाकाजाचं नियमित अधिवेशन उद्या सुरू होणार आहे. सेनेनं विरोधी पक्षनेतेपद सोडल्यामुळे भाजपची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विरोधीबाकासाठी तयारी सुरू केलीय. त्यामुळे अधिवेशानात पूर्वीचे सत्ताधारी आता विरोधीबाकावर आणि पूर्वीचे विरोधक आता सत्तेत भूमिका वठवणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा सामना करता हे पाहण्याचं ठरणार आहे.

चहापानाला मुख्यमंत्रीच अनुपस्थित

अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय पण स्वत: मुख्यमंत्रीच पंतप्रधान नरेंद्र मोदीं यंाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांच्या ऐेवजी संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट चहापानाचे आयोजक असणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्रीच उपस्थित नाहीत म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आधिच सराकरवर टीका केलीय तर चहापानावर काँग्रेस बहिष्कार घालणार असल्याचं सुतोवाच उपनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केलंय.

अधिवेशनात गाजणारे काही महत्वाचे मुद्दे…

– भीषण दुष्काळी परीस्थिती
– शेतकर्‍यांचा आत्महत्या
– कापूस, उसाच्या हमीभावाचा मुुद्दा
– कापूस , सोयाबीन आणि धानाच्या शेतकर्‍यांना मदत
– प्रादेशिक असमतोलावरचा केळकर समीतीचा अहवाल
– LBT बाबत सरकारचं घुमजावं
– नव्या टोलधोरणासंबघीचा प्रश्न
– विकास कामांना मोठ्या प्रमाणावर कात्री

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close