नियोजन आयोगाच्या पुनर्रचनेसंदर्भात पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसह बैठक

December 7, 2014 12:15 PM0 commentsViews:

pm meeting_delhi07 डिसेंबर : नियोजन आयोगाची पुनर्रचना करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरच्या आपल्या भाषणात जाहीर केला होता. आज (रविवारी) याचसाठी राजधानी दिल्लीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक होतेय.

देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना यासाठी निमंत्रण देण्यात आलंय. नियोजन आयोगाची रचना धोरण आयोग अशा स्वरूपात करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. याबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांना काय वाटतं, त्यांच्या काय सूचना आहेत याबद्दल सविस्तर चर्चा इथं होणार आहे.

या बैठकीसाठी मात्र तृणमूल काँग्रेसच्या ध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अनुपस्थित आहेत. त्यांच्याऐवजी पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा उपस्थित आहे. त्यामुळे आता त्रिपुराचे माणिक सरकार आणि ओडीशाचे नवीन पटनाईक इथे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close