डॉक्टराच्या चुकीच्या औषधामुळे शरीराची त्वचाच जळाली

December 7, 2014 12:10 PM0 commentsViews:

kalyan_p34507 डिसेंबर : छत्तीसगड आणि पंजाबमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या घटना उघड झाल्यात. आता तसाच प्रकार मुंबईत कल्याणमध्ये घडलाय. डॉक्टरांनी चुकीची औषध दिल्यामुळे एका 28 वर्षीय महिलेची त्वचा जळाल्याची घटना घडलीये. तिच्यावर दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.

कल्याणमध्ये राहणार्‍या या पीडित महिलेल्या 16 दिवसांपूर्वी डॉक्टरांनी दिलेल्या औधषांमुळे संपूर्ण शरीराची त्वचाच जळण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. औषधाच्या रिऍक्शनमुळे महिलेची त्वचा गळून पडू लागलीये. 28 वर्षांची ही महिला गेल्या 16 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देतेय. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तिच्यावर मुंबईतल्या सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रारीचा अर्ज दाखल केलाय. पण संपूर्ण चौकशीनंतरच एफआयआर दाखल करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी पोलीस आता वैद्यकीय अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close