गोपीनाथ मुंडे भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी

July 11, 2009 1:17 PM0 commentsViews: 19

11 जुलै भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांची महाराष्ट्राच्या निवडणूक प्रभारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी ही घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता ही नेमणूक करण्यात आली आहे. याआधी लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्राची जबाबदारी भाजपचे नेते नरेंद्र मोदींकडे होती. मात्र शुक्रवारी अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र विधानसभा हेच आमचं मुख्य लक्ष आहे. त्यामुळे या निवडीला महत्व प्राप्त झालं आहे. गोपीनाथ मुंडे हे ओबीसींचे नेते असल्याने तसंच राज्याच्या राजकारणाची आणि प्रश्नांची जाण असल्याने ही नेमणुक करण्यात आली आहे. 1994 साली गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती. त्याचा फायदा भाजपाला झाला आणि राज्यात सेना-भाजपाची सत्ता आली होती. याआधी लोकसभेसाठी महाराष्ट्राची जबाबदारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे होती. मात्र त्याचा भाजपला फायदा न होता नुकसानच झालं, असा निष्कर्ष युतीने काढला होता. त्यामुळे आता पक्षाने गोपीनाथ मुंडे यांच्या एक हाती राज्याचा कारभार सोपवला आहे.

close