लाखांची माकडं

December 7, 2014 3:47 PM0 commentsViews:

07 डिसेंबर : दुर्मिळ आणि नामशेष होत असलेल्या स्लेंडर लॉरीस या प्रजातीच्या माकडांची विक्री होत असल्याची घटना ठाण्यात उघडकीला आलीय. लाखो रूपये किंमत असलेल्या या जातीच्या चार माकडांची सुटका ठाणे पोलिसांनी केली. याप्रकरणी अटक केलेल्या चौघांना ठाणे न्यायालयानं आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. ठाण्यातल्या मानपाडा पेट्रोल पंप ते घोडबंदर सर्व्हिस रोडदरम्यान काहीजण स्लेंडर लॉरीस जातीच्या माकडांची विक्री करतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून चार जणांना अटक केली. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं या चारही माकडांची सुटका करून त्यांना वनविभागाच्या हवाली केलंय. स्लेंडर लॉरीस जमातीची माकडं तामिळनाडूच्या जंगलात आढळतात. या प्राण्याला स्थानिक आदिवासी समाज पुजतो. या प्राण्याचं संपर्ण शरीर औषधी असल्याचा प्रघात आहे. त्यामुळे याचा वापर काळ्या जादूसाठीही केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या प्रजातीच्या माकडांची किंमत तब्बल 5 कोटींपर्यंत जाते. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close