कुडाळजवळ जनशताब्दी एक्स्प्रेसला अपघात, 15 जखमी

December 7, 2014 7:39 PM0 commentsViews:

janshatabadi_sindhu07 डिसेंबर : सिंधुदुर्ग कुडाळजवळ जनशताब्दी एक्स्प्रेसला अपघात झालाय. जेसीबी मशीन रेल्वे ट्रॅकजवळ कोसळला. जेसीबी मशीनचा काही भाग तीन डब्यांना घासला. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मडगाववरून -मुंबईकडे येणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला दुपारी 4 वाजता बोर्डवे गावाजवळ अपघात झाला. रोडच्या कामासाठी
असलेल्या जेसीबी मशीनचा पुढचा भाग धावत्या रेल्वेवर कोसळून ट्रॅकजवळ पडला. त्याचवेळी तेथून जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या तीन डब्ब्यांना जेसीबी मशीनच्या समोरील भाग घासला गेला. यात तीन डब्ब्यांचा पत्रा फाटला. अचानक झालेल्या या अपघाताने प्रवासीही गोंधळून गेले. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले. जखमींना कणकवलीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तसंच खासगी डॉक्टरांचं पथक कणकवली रेल्वे स्टेशनवर आलं असून तिथंही प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने जेसीबी मशीन रेल्वे ट्रॅकच्या बाजूला कोसळला त्यामुळे मोठी दुर्घटना टळलीये. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close