भंडा-यातील बोट दुर्घटनेत 34 महिलांचा मृत्यू

July 12, 2009 2:59 PM0 commentsViews: 1

12 जुलैवैनगंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 34 महिलांनी जीव गमावला आहे. बोटीतल्या 38 महिलांपैकी 26 महिलांचे मृतदेह रविवारी संध्याकाळपर्यंत सापडले होते. भंडा-यातल्या खुमारीबुटी गावात ही दुर्घटना घडली. यापैकी 45 महिलांना गावक-यानी वाचवलं. शेतीचं काम करून या महिला भंडा-याच्या दिशेनं परतत असताना ही घटना घडलीय. पाण्याचा जोर अचानक वाढल्यानं संतुलन गमावून या बोटी बुडाल्या. मृत्यूमुखी पडलेल्या 3 महिलांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आलेत. दुर्घेटनेत सापडलेल्या 30 महिला सुरेवाडी गावातल्या आहेत. तर 8 महिला खुमारी बुटी गावातल्या आहेत.

close