नियोजन आयोगासाठी ‘नव्या बाटलीत जुनी दारू’च !

December 7, 2014 10:28 PM0 commentsViews:

Union Ministers State Chief Ministers together07 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून नियोजन आयोग बरखास्त करण्याची घोषणा केली खरी पण पुन्हा नियोजन आयोगासाठी ‘नव्या बाटलीत जुनी दारू’ असा प्रयोग होणार आहे. यूपीए सरकारने ज्या उपाययोजना राबवल्या त्याच उपाययोजनांना नवं स्वरूप देऊन नियोजन आयोगाच्या ऐवजी नवी संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचं कळतंय.

नियोजन आयोगाच्या पुर्नरचनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. 7, रेसकोर्स रोड या पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. दिवसभर चाललेल्या या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांची मत पंतप्रधानांनी जाणून घेतली. नियोजन आयोग बरखास्त केल्यानंतर त्याची जागा कशी भरून काढणार असा प्रश्न सर्वांनाच पडला. आजच्या बैठकीत त्यादृष्टीने विचार झाला. राज्यांच्या गरजा लक्षात घेता, नवी संस्था 4 पातळ्यांवर काम करेल असं सांगण्यात आलं. नियोजन आयोग बरखास्त केल्यानंतर त्याऐवजी नवीन थिंक टँक स्थापन करण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे. या बैठकीत त्यावरही विचार झाला. नियोजन आयोगाच्या ऐवजी नवीन संस्था उभारण्यास बहुतांश मुख्यमंत्री अनुकूल असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

बैठकीत यावर झाली चर्चा

1. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, इतर मंत्र्यांची परिषद
– यामध्ये मुख्यमंत्र्यांना नियमितपणे आपल्या मागण्या, मतं मांडता येतील
2. माहिती आणि नवीन प्रयोग, संशोधन केंद्र
3. डायरेक्ट कॅश ट्रान्सफर
4. UIDAI – आधार
या बाबींचा समावेश असेल

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close