‘शिवनेरी’ची आता मुंबई ते नागपूर भरारी !

December 7, 2014 8:41 PM1 commentViews:

shivneri07 डिसेंबर : एसटी महामंडळाला नवी उभारी देणारी ‘निळ्या’परीने आता आणखी एक भरारी घेतलीये. मुंबई ते पुणे आणि पुणे ते औरंगाबाद या मार्गावर धावणारी  वातानुकुलित शिवनेरी आता मुंबई ते नागपूर धावणार आहे.

शनिवारपासून मुंबई ते नागपूर शिवनेरी बस सेवेला सुरूवात झालीये. या प्रवासाला 18 तास लागणार आहेत. दुपारी 3 वाजता मुंबईहून सुटल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता शिवनेरी नागपूरला पोहोचेल. मात्र या गारेगार आणि लांबपल्ल्याच्या या प्रवासासाठी तेवीसशे सत्तर रुपये मोजावे लागणार आहे. 5 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात आलीये. प्रतिसाद चांगला मिळाला तर हा रूट सुरू ठेवू, असं एमएसआरडीचेने महाव्यवस्थापक कॅप्टन रत्नपारखी यानी सांगितलंय. याच महिन्यात मुंबई-पणजी शिवनेरीही सुरू होणार आहे. या प्रवासात चिपळूण जाणारी ही बस येताना मात्र कोल्हापूर-कराड-सातारा-पुणे मार्गे येण्याचं नियोजन आखण्यात आलंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्यामुळे नागपूरवासींना यामुळे थेट मंत्रालय गाठण्यास आणखी सोईस्कर होणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Mayur Divate

    मुंबई – पुणे -बंगलोर पण चालू करा !!!

close