विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडेंची शिफारस

December 8, 2014 12:53 PM0 commentsViews:

dhanjay munde08 डिसेंबर : राष्ट्रवादीने आता विरोधी पक्षनेतेपदासह विधान परिषदेच्या पक्षनेतेपदासाठी जोरदार तयारी सुरू केलीये. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आलीय.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरेंनी सभापती शिवाजीराव देशमुख यांची भेट घेतली. त्यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केलाय. विधान विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनाही यासंदर्भात निवदेन दिलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close