काँग्रेसचं विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन

December 8, 2014 1:16 PM0 commentsViews:

vidhan_bhavan08 डिसेंबर : राज्याचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं असून अपेक्षेप्रमाणे अधिवेशनाची वादळी सुरूवात झालीये. अधिवेशनचा सुरूवातच विरोधकांच्या निदर्शनांपासून झालीये. काँग्रेसच्या आमदारांनी आज विधानभवनात हल्लाबोल आंदोलन केलं.

काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्व आमदारांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत करा आणि शेतकर्‍यांना न्याय द्या अशा मागण्या करत भवनाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच विधानभवनाच्या पायरीवर आमदारांनी ठिय्या आंदोलन केलंय. मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळाबाबत राज्य सरकारने तातडीने पावलं उचलावी अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली.

तर दुसरीकडे विधान परिषदेत विरोधी पक्षांमध्ये फूट पडलीये. शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर चर्चा करावी अशी काँग्रेसनं मागणी केलीये. तर कार्यक्रमपत्रिकेनुसार कामकाज व्हावं ही अशी मागणी राष्ट्रवादीने केलीये. यामुळे सभागृहात गदारोळ झाला. विधानपरिषदेचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close