जायकवाडीचं पाणी पुन्हा पेटलं, नगरच्या शेतकर्‍यांचा विरोध

December 8, 2014 1:31 PM0 commentsViews:

Image img_220662_jayakwadi_240x180.jpg08 डिसेंबर : दुष्काळग्रस्त मराठवाड्याची भिस्त असलेल्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. पण याही वर्षी अहमदनगरच्या शेतकर्‍यांनी मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून विरोध दर्शवला असून शेतकरी रस्त्यावर उतरले आहे.

 मराठवाड्यातील जायकवाडीमध्ये मुळा धरणातून पाणी सोडायला सुरूवात झालीय. मुळा धरणातून जायकवाडीसाठी 1100 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येतंय. तर भंडारदर्‍यातून 5000 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जातंय. महामंडळाने दिलेल्या आदेशानुसार भंडारदरा पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचं नियोजन सुरू केलंय. पण अहमदनगर जिल्ह्यातले नेते आणि शेतकरी याला मोठ्या प्रमाणात विरोध करत आहे. हे पाणी कोणत्याही परिस्थितीत मराठवाड्याला न देण्याची भूमिका नगरच्या शेतकरी आणि नेत्यांनी घेतलीय.

आज दिवसभर नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली. नेवासे तालुक्यात नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगावमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरराव गडाख आणि विठ्ठलराव लंघे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. तर नेवासा शेवगाव रस्त्यावर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी नदीवरच्या बंधार्‍यावर ठाण मांडून बसले होते. श्रीरामपूर तालुक्यात माजी आमदार जयंत ससाणे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको करण्यात आला तर राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनीे निळवंडे धरणाच्या भिंती जवळ ठिय्या आंदोलन केलं. एकंदरीत पाणी सोडण्याच्या या निर्णयामुळे अहमदनगर विरूद्ध मराठवाडा असा संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. जायकवाडी धरणात पाणी शिल्लक असताना आमच्या हक्काचे पाणी आम्ही जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेण्यात आलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close