भगवत् गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा द्या, सेनेचा स्वराज यांना पाठिंबा

December 8, 2014 1:57 PM0 commentsViews:

swaraj_sena308 डिसेंबर : शिवसेना आणि भाजपचा संसार पुन्हा फुलला असून त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. भगवत् गीता राष्ट्रीय पवित्र ग्रंथ म्हणून जाहीर करावा अशी मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली होती. स्वराज यांच्या मागणी शिवसेनेनं आता पाठिंबा दर्शवला आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भगवत् गीता राष्ट्रीय पवित्र ग्रंथ म्हणून जाहीर करावा, असं वक्तव्य केल्यामुळे बराच वादंग उठला होता. आता शिवसेनेनंही स्वराज यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय. शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी सुषमा स्वराज यांच्या भगवत् गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा द्यावा हे आपल्याला मान्य असल्याचं गीतेंनी म्हटलं आहे. तर स्वराज यांनी आपल्या घटनेचा आदर करायला हवा होता, असं बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी म्हटलंय. आपण विविध धर्मांवर विश्वास ठेवतो, याबद्दल स्वराज यांनी भान ठेवायला हवं होतं. उद्या इतर धर्मांचे लोकही त्यांच्या पवित्र ग्रंथांना राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी करतील असा सवाल मायावती यांनी उपस्थित केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close