मुंबईत पुन्हा ‘दम मारो दम…’हुक्का पार्लरवरची बंदी कोर्टाने उठवली

December 8, 2014 5:28 PM0 commentsViews:

hukka_parlour08 डिसेंबर : मुंबईत पुन्हा एकदा ‘दम मारो दम..’ म्हणत गल्लोगली फुक्यांची टवाळकी भरणार आहे. मुंबई महापालिकेने मुंबई आणि परिसरात हुक्का पार्लरवर घातलेली बंदी सुप्रीम कोर्टाने आज (सोमवारी) उठवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू होणार आहेत. ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये स्मोकिंग झोन आहे त्या ठिकाणी हुक्का पार्लर चालवायला हरकत नाही, असं नमूद करत सुप्रीम कोर्टाने पालिकेची बंदी उठवली आहे.

मुंबई तीन वर्षांपूर्वी गल्लोगली फोफावलेल्या हुक्का पार्लरमुळे तरुण-तरुणी ओढावले गेले होते. पार्लरच्या माध्यमातून तरुणांना व्यसनाधीन बनवण्याचे प्रकार होत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं हुक्का पार्लरवर बंदी घातली होती. तरुण-तरुणींनी व्यसनापासून दूर रोखण्यात यावं या हेतूने पालिकेनं हा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे हुक्का पार्लरवर बंदी असून सुद्धा छुप्या मार्गाने पार्लर सुरूच होते. वेगवेगळ्या शहरांतही हुक्का पार्लर सुरूच राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील काही हुक्कापार्लर व्यावसायिकांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. आज सुप्रीम कोर्टाने हुक्का पार्लर व्यावसायिकांची बाजू घेत बंदी उठवण्यात आलीये. हुक्का पार्लरला एका प्रकारे आता अधिकृत परवानगी मिळाल्यामुळे राज्यभरात पुन्हा हुक्का पार्लर संस्कृती येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close