मार्डशी बोलणी फिसकटली

July 13, 2009 11:38 AM0 commentsViews: 4

मार्ड आणि सरकार दरम्यान चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे. राज्य सरकारने 5 हजारापर्यंत स्टायपेंड वाढीचं लेखी आश्वासन देण्यास तयार आहे. या मुळे सरकारवर महिन्याला 14 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.असं वैद्यकीय शिक्षणमंत्री राजेश टोपेंनी सांगितल. पण मार्ड 27 हजारांच्या खाली स्टायपेंड वाढ स्वीकारायला तयार नाही. दुपारी अडीच वाजता चर्चेची पुढची फेरी होणार आहे. या चर्चेनंतर मार्डचे पदाधिकारी तडजोडीला तयार झाले नाही, तर त्यांची नोंदणी रद्द करण्याचा सूचना मेडीकल काऊन्सिल ऑफ इंडिया (MCI) ला राज्य सरकार देणार आहे. याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवासी डॉक्टरांची आरोग्य विज्ञान विद्यापीठातली प्रवेश नोंदणीही रद्द करण्याच्या सूचना राज्य सरकार देणार आहे. दरम्यान बॉम्बे हॉस्पिटलच्या तीस ते चाळीस डॉक्टर्सनीही आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. मात्र या संपामुळे हॉस्पिटलच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. असं हॉस्पिटलच्या प्रशासनाचं म्हणणंआहे.

close