गाऊन घातलेल्या महिलांना 500 रुपये दंड, महिला मंडळाचा अजब फतवा

December 8, 2014 9:20 PM2 commentsViews:

navi_mumbai_gawon08 डिसेंबर : एखादी महिला मॅक्सी किंवा गाऊन घालून गावात फिरली तर तिला 500 रुपयांचा दंड ठोठावला जाईल असा अजब फतवा नवी मुंबईत एका महिला मंडळानेच काढलाय. एवढंच नाहीतर महिलांनी उत्तेजक वेशभूषा केल्यानं पुरुष आकर्षित होतात आणि त्याचमुळे बलात्कार होतात, असा अजब तर्कही या मंडळाने काढलाय.

हरियाणातील खाप पंचायतीच्या तोडीस तोड ठरेल असा एक फतवा नवी मुंबईतील एका महिला मंडळानं काढलाय. गोठिवली गावातल्या महिलांना या फतव्याद्वारे मॅक्सी अथवा गाऊन घालून गावात फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. नवी मुंबईच्या गोठिवलीमधल्या इंद्रायणी महिला मंडळानं हा अजब फतवा काढला आहे. जर एखादी महिला मॅक्सी घालून गावात फिरली तर तिला 500 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. गावाच्या वेशीवर असा आदेश देणारा फलकच लावण्यात आला आहे. महिलांनी उत्तेजक वेशभूषा केल्यानं पुरुष आकर्षित होतात आणि त्याचमुळे बलात्कार होतात, असा अजब तर्क महिलांनी केलाय. मुंबईला अगदी लागून असलेल्या नवी मुंबईत 2014 साली असला अजब फतवा काढला गेल्यानं आश्चर्य आणि खंत व्यक्त होतीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Dipesh

    What a disgusting statement made by that lady.. “Aamchya purushanwar tyacha dushparinaam hoto”.. So go and control your Men’s. This ladies (mahila Mandal) should respect first other ladies and then think what you are doing.
    If tomorrow someone coming from outside of that area with very short cloths or gown, then plz mention what this ladies will gona do with them.

  • dnyanu aldar

    Like this ,this true ,iagri with that dissigen

close