मुंबईत पावसामुळे जनजीवनावर परिणाम

July 14, 2009 11:23 AM0 commentsViews: 2

मुंबई 14 जुलै मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सकाळी विश्रांती नंतर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिरा धावत आहेत. सायन, घाटकोपर, वडाळा, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी या स्टेशनमध्ये ट्रॅक पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान मिठीने नदीची धोक्याची पातळी ओलांडली आहे. पश्चिम उपनगरांमध्येही पाऊसाची संतत धार सुरु आहे. शहरात सकाळी 7.30 पर्यंत 147.1 मि.मी. पाऊस झाला. तर पूर्व उपनगरात 145.4 मि.मी. पाऊस पडलाय. तर पश्चिम उपनगरात 107.7 मि.मी. पाऊस झाला आहे.

close