राज्यातील शिक्षकही संपावर

July 14, 2009 11:29 AM0 commentsViews: 2

मुंबई 14 जुलैराज्यातील शिक्षकांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. 90/10 टक्के कोट्याचा कायदा करावा या मागणी साठी शिक्षक भारती संघटनेनं हा संप पुकारला आहे. याशिवाय सहावा वेतन आयोग शालेय शिक्षकांना लागू करावा. आझाद मैदानामध्ये या सर्व शिक्षकांनी एकत्र जमून निदर्शनं केली. लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी हा संप पुकारण्यातआला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभरातले शिक्षक 4 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जातील असा इशारा सरकारला दिला आहे.

close