राज ठाकरेंचा देसी लूक, राज अवतरले धोतर आणि कुर्त्यात !

December 9, 2014 6:32 PM0 commentsViews:

raj_thackeray_in_dhoti_and_kurta

08 डिसेंबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे…राजकारणाच्या आखाड्यात जरी पक्षाची दैना झाली असली तर राज ठाकरेंची क्रेझ मात्र कमी झालेली नाही. राज ठाकरे कल्याण डोंबिवलीच्या दौर्‍यावर आहे. यावेळी राज यांचा नवा लूक डोंबिवलीकरांना पाहायला मिळाला. डोंबिवली जिमखाना इथं राज ठाकरे काल चक्क धोतर आणि कुर्ता घालून वावरत होते. राज ठाकरे यांना या नव्या लूकमध्ये बघून डोंबिवलीकरांना सुखद धक्का बसला. त्यानंतर नागरिकांना त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही. राज ठाकरेंनीही मग मनमुरादपण लोकांसोबत फोटो काढले आणि त्यांच्याशी गप्प मारल्या.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close