मार्डशी बोलणी यशस्वी : राजेश टोपे यांची घोषणा

July 14, 2009 12:09 PM0 commentsViews: 7

14 जुलै मुंबई मार्डच्या सात दिवसाच्या संपावर आज तोडगा निघाला आहे. राज्य सरकार आणि मार्ड यांच्यातल्या चर्चेनंतर सात हजार रूपये स्टायपेंड वाढ देण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली आहे. गेल्या सात दिवसापासुन सुरु असलेल्या या संपाने रुग्णांचे अतोनात हाल होत होते. संप मिटल्याची अधिकृत घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केली. ही स्टायपेंड वाढ इतर राज्या पेक्षा सर्वाधिक असल्याचही टोपे यांनी सांगितलं आहे. मात्र, मार्डने हा संप मागे घेतल्याची घोषणा अद्याप केलेली नाही.

close