एकीकरण समितीच्या महामेळाव्यानंतर पाटील समर्थक भिडले

December 9, 2014 9:11 PM0 commentsViews:

maharashtra_ekikaran09 डिसेंबर : बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा पार पडला पण या मेळाव्यानंतर आमदार संभाजी पाटील यांच्या समर्थकांत झालेल्या हाणामारीचं गालबोट लागलं. मेळावा संपल्यानंतर मंडपातच समर्थक एकमेकांना भिडले.

गेल्या 60 वर्षापासून बेळगाव सीमाप्रश्नाचा लढा लोकशाही मार्गाने चाललाय. पण आज एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांच्या समर्थकांनी आपांपसातच हाणामारी केल्यानं मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आजच्या महामेळाव्यानंतर संभाजी पाटील यांचे निकटवर्तीय संजय सातेरी आणि स्वीय सहाय्यक चाळके यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली. पर्यायाने याचे रुपांतर हाणामारीत झालं. उपस्थित असल्याने एकीकरण समितीच्या सदस्यांनी मध्यस्थी करून दोघांचीही समजूत काढली पण वैयक्तिक कारणावरुन झालेल्या हाणामारीनं मराठी माणसांतच फूट पडल्याची भावना आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close