जायकवाडीचं पाणी कुणाला ?,सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

December 9, 2014 9:20 PM0 commentsViews:

Supreme_Court_of_In_620444f09 डिसेंबर : पाण्याच्या प्रश्नावरून मराठवाडा आणि अहमदनगरमधला वाद पेटलाय. अहमदनगरचं पाणी मराठवाड्याला का द्यायचं, असा प्रश्न अहमदनगरमधले नेते आणि शेतकरी विचारत आहेत. आता हा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे.

‘हरिश्चंद्र फेडरेशन’ या अहमदनगरच्या संस्थेची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. अहमदनगरमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयावर त्यात आक्षेप घेण्यात आलाय. हायकोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्यात आलीय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची ही संस्था आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा या संस्थेकडूनही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. दरम्यान, प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचे दरवाजे खुले करायला अहमदनगरचे शेतकरी विरोध करत आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जायकवाडीला पाणी सोडू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. आमच्यावर अन्याय करुन मराठवाड्याला पाणी देण्याची सरकारची भूमिका चुकीची आहे, असं शेतकर्‍यांचं म्हणणं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close