मुंबईच कशाला ?, इतर शहरांचाही विकास करा -राज ठाकरे

December 9, 2014 11:13 PM1 commentViews:

raj34509 डिसेंबर : मुंबईचाच विकास कशाला ?, इतरही शहरं आहे. नागपूर, नाशिक आहे. त्यांचाही विकास झाला पाहिजे. पंतप्रधानांनी फक्त मुंबईकडेच का लक्ष द्यावे असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. ते डोंबिवलीत बोलत होते.

दोन दिवसांपूर्वी दिल्लीत देशातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत मुंबईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता. मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावावरून आता वाद पेटलाय. शिवसेनेनं या आक्षेप घेत भाजपला समज दिलीये. ‘मुंबईचा विकास व्हावा हे तर खरेच, पण रोगापेक्षा औषध भयंकर ठरेल असे काही घडू नये. मंगलकार्य करावयास जावे पण अचानक श्राद्ध घडावे हा धोका वाटत असल्यानेच मुंबईच्या बाबतीत ताकही फुंकून प्यावे असा सल्लावजा टोला शिवसेनेनं आजच्या ‘सामना’मधून भाजपला लगावलाय. आता या वादात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली. फक्त मुंबईचाच विकास कशाला करताय. इतर शहरंही आहेत त्यांचा विकास करा. नाशिक, नागपूर, पुणे आहे, दिल्लीही आहे. सर्वच शहरांचा विचार व्हायला हवा. फक्त एका शहरांचा विचार कसा करता येईल अशी टीका राज यांनी केली. विशेष म्हणजे राज यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान देशाचे आहे की गुजरातचे अशी टीकाही केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहे. कोणताही विषय न समजून घेता केवळ आकांडतांडव घातलं जात आहे असं प्रत्यत्तर त्यांनी दिलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aruna Joshi

    He is right… all cities and towns are important… population, industries should get spread …should not concentrate…

close