थंडीचा कडाका वाढला, नगरचा पारा @ 8.5

December 10, 2014 9:42 AM0 commentsViews:

Image img_190382_thandi_240x180.jpg10 डिसेंबर : राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा पारा चांगलाच वाढलाय.अनेक शहरांमध्ये पारा 10 अंशांच्या खाली गेलाय. सर्वात कमी तापमान अहमदनगर जिल्ह्यात नोंदवलं गेलंय. नगरमध्ये सध्या 8.5 अंश सेल्शियस एवढं तापमान आहे.

तर पुण्यात या हंगामातील 10.2 डिग्री सेल्सिअस इतक सर्वात निचांकी तापमान शनिवारी नोंदवल गेलंय. त्यामुळे मॉर्निंग वाकसाठी पुणेकरांची पर्वती,पु.ल.देशपांडे उद्यान इथं गर्दी होतेय. तर तरुणाई टपरीवर चहा-भज्यांचा आस्वाद घेताना दिसतेय. त्याचबरोबर जागोजागी शेकोट्याही पेटलेल्या दिसत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close