ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचं निधन

December 10, 2014 1:11 PM0 commentsViews:

chandrakant_khot10 डिसेंबर : ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचं आज (बुधवारी) सकाळी मुंबईत निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. अतिशय मनस्वी आणि तरीही अलिप्त असे साहित्यिक म्हणून खोत यांची ओळख होती. विवेकानंद यांच्या आयुष्यावरची ‘बिंब-प्रतिबिंब’ ही त्यांची गाजलेली कादंबरी होती. तसंच रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या नात्यावरची दोन डोळे शेजारी ही त्यांची कादंबरीही खूप गाजली.

मुंबईत चिंचपोकळी जवळच्या एका साई मंदिरात खोत अनेकदा नामस्मरणात गढलेले असायचे. विवेकानंदावरच्या त्यांचा गाढा अभ्यास होता.संन्याशाची सावली ही कादंबरीही त्यांनी विवेकानंदांवर लिहिली होती. ‘अबकडई’ या दिवाळी अंकाचं संपादनही त्यांनी केलं होतं. खोत यांनी धाडसी लिखाणही केलं होतं. मुंबईतल्या पुरूषवेश्यांवरची जीवनावरची उभयान्वयी अव्यय ही कादंबरी त्यांनी लिहिली. अतिशय प्रतिभावान आणि मनस्वी अशा या लेखकाची प्रस्थापित साहित्यिकांनी मात्र कायमच उपेक्षा केली.

चंद्रकांत खोत यांचं साहित्य

बिंब-प्रतिबिंब (विवेकानंदांवरची कादंबरी)
संन्याशाची सावली
अपभ्रंश
अनाथांचा नाथ (साईबाबांचे चरित्र)
हम गया नही, जिंदा है (स्वामी समर्थांच्या जीवनावरची कादंबरी)
मेरा नाम शंकर, (धनकवडीच्या शंकर महाराजांच्या जीवनावरची कादंबरी)
दोन डोळे शेजारी (विवेकानंद)
गण गण गणात बोते (गजानन महाराजांचं चरित्र)
उभयान्वयी अव्यय (पुरूष वेश्यांवरची कादंबरी)
अलखनिरंजन (नवनाथांच्या जीवनावर)
बाराखडी
बिनधास्त
कथासंग्रह- दुरेघी
काव्यसंग्रह- मर्तिक
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close