घुमान साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ.सदानंद मोरे

December 10, 2014 3:20 PM0 commentsViews:

sadanad_more2310 डिसेंबर : घुमानमध्ये होणार्‍या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली आहे. संत साहित्याचे जाणकार आणि तुकाराम महाराजांचे वंशज असलेले सदानंद मोरे अध्यक्षपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात होते. अपेक्षेप्रमाणे मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.

पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेत सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली होती. विक्रमी मतदान झाल्यानं यंदाची ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली आहे. 1074 पैकी 1020 मतदारांनी मतदान केलंय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारत सासणे, अशोक कामत ,पुरुषोत्तम नागपुरे हे देखील रिंगणात होते. सदानंद मोरे यांना 498 मतं मिळाली तर भारत सासणे यांना 427, अशोक कामत यांना 65मतं , तर पुरूषोत्तम नागपूरेंना 2 मतं मिळाली. एप्रिलमध्ये हे संमेलन घुमानमध्ये संपन्न होईल.

सदानंद  मोरे यांचा अल्पपरिचय

– डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर)
– लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार
– एम. ए. (तत्वज्ञान)
– एम. ए. (प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास )
– द गीता – अ थिअरी ऑफ ह्युमन ऍक्शन या विषयावर पी. एच. डी. चे संशोधन
– सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी गुरुदेव दामले पुरस्कार
– पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत विविध अध्यासनांचे समन्वयक प्राध्यापक म्हणून बरीच वर्ष कार्यरत
– संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा
– अनेक संत साहित्य विषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन आणि संपादन
– तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह 15 संस्थांचे पुरस्कार
– उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनासह 10 संस्थांचे पुरस्कार

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close