मुळा धरणाचं पाणी जायकवाडी धरणात पोहचलं

December 10, 2014 1:48 PM0 commentsViews:

mula_water34310 डिसेंबर : मुळा धरणातून परवा सोडलेलं चार टीएमसी पाणी आज जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरला पोहचलं आहे. जवळपास 60 किमीचा प्रवास करुन आज हे पाणी मराठवाड्यात पोहचलं. गोदावरी प्राधिकरणाच्या आदेशानुसार हे पाणी सोडण्यात आलंय. निळवंडे धरणातूनही 3.89 टीएमसी पाणी आज किंवा उद्या सोडण्यात येणार आहे.

जायकवाडीला पाणी सोडण्यावरून अहमदनगर आणि मराठवाड्यामध्ये आंदोलनं पेटली आहे. पाणी थांबवण्यासाठी नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी सुप्रीम कोर्टातही धाव घेतलीय. समन्यायी पाणी वाटपाच्या निकषांनुसार मराठवाड्याला 7.89 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी प्राधिकरणानं दिले होते. प्राधिकरणानं 19.50 टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याची शिफारस केली होती. आणि मराठवाड्याच्या पाण्याची मागणी 27 टीएमसी इतकी आहे. जायकवाडीला पाणी मिळावं की नाही यासंदर्भात आतापर्यंत 17 याचिका दाखल झाल्या आहेत. दरम्यान, जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. अहमदनगरच्या हरिश्चंद्र फेडरेशनन्ं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाच्या पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती दयायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. सोमवारी यासंदर्भातली सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या जनतेला काहीसा दिलासा मिळालाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close