आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा ठरणार नाही, कलम 309 रद्द होणार

December 10, 2014 5:14 PM0 commentsViews:

309 art10 डिसेंबर : आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा ठरवू नये यासाठी लवकरच भारतीय दंडविधान संहितेत बदल करणार असून, आयपीसीचं कलम 309 काढून टाकण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. केंद्रीय गृहमंत्रालयानं ससंदेत तशी माहिती दिलीय. या निर्णयाला 18 राज्यांचा आणि 4 केंद्रशासित पाठिंबा असल्याचंही केंद्रानं सांगितलंय.

कलम 309 नुसार आत्यहत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा ठरतोय. यात जर दोषी आढळलं तर एक वर्षाचा तुरुंगवास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. अनेक वेळा वैफल्यग्रस्त झालेली व्यक्ती किंवा मानसिकदृष्ट्या खचलेली व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते पण जर आत्महत्येचा प्रयत्न फसला तर त्याला कलम 309 नुसार शिक्षा दिली जाते. अगोदरच खचलेल्या व्यक्तीला शिक्षा देऊन त्यावर अन्याय केला जातो त्यामुळे कलम 309 काढून टाकावे अशी मागणी पुढे आली होती. 1978 मध्ये आयपीसी संशोधन विधेयक राज्यसभेत पास झालं होतं. त्याद्वारे कलम 309 रद्द केला जाऊ शकतो. पण लोकसभेत सादर होण्याअगोदरच हे विधेयक रद्द करण्यात आलं होतं. ऑगस्ट महिन्यात हे विधेयक पुन्हा संसदेत मांडण्यात आलं. आता या निर्णयाला 18 राज्यांचा आणि 4 केंद्रशासित पाठिंबा असल्याचंही केंद्रानं सांगितलं आहे. दोन्ही सभागृहाने जर मंजुरी दिली तर हा कलम 309 रद्द होईल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close