अखेर अधिवेशनात दुष्काळावर चर्चा

December 10, 2014 6:26 PM0 commentsViews:

vidhanbhavan_nagpur10 डिसेंबर : अखेर राज्यातल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये चर्चेला सुरुवात झालीये. विरोधकांच्या मागणीचा मान ठेवत सरकारनं सर्व कामकाज बाजूला सारून हवा तेवढा वेळ दुष्काळावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला.

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये तर ओलिताखालच्या फळबागांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची मागणी विरोधकांनी सरकारकडे केली आहे. तसंच आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या वारसदारांना 5 लाख रुपयांची मदत करण्याची मागणी करण्यात आलीये. विरोधकांच्या सर्व मागण्यांवर सरकारच्या वतीनं उद्या उत्तर दिलं जाणार आहे. दरम्यान, सरकारनं आज 9200 कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडल्या. त्यामध्ये दुष्काळ निवारणासाठी 2000 कोटींची तरतूद करण्यात आलीये. त्यामुळे राज्य सरकारचे 2000 कोटी आणि केंद्राची मदत मिळून सरकार दुष्काळासाठी भरीव असं पॅकेज जाहीर करतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close