भंडार्‍यात शेतकर्‍याची नरबळी ?, शेताच्या मंदिरात निर्घृण हत्या

December 10, 2014 8:55 PM0 commentsViews:

kolhapur crime10 डिसेंबर : भंडार्‍यामध्ये मोहाडी तालुक्यात एका शेतकर्‍याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. सुरेंद्र धांडे असं या शेतकर्‍याचं नाव आहे. शेतातील मंदिरात धांडे यांची गळा चिरून छातीवरही धारदार शस्त्रांचे वार करण्यात आले. ही हत्या नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होतं आहे.

भंडार्‍यामध्ये मोहाडी तालुक्यातील खुटसावरी गावात राहणारे 35 वर्षीय सुरेंद्र धांडे मंगळवारी रात्री शेतातल्या धानाची पाहणी करण्यासाठी धांडे गेले होते.मात्र ते परत न आल्यानं घरच्यांनी शोध घेतल्यावर त्यांचा मृतदेहच सापडला. सुरेंद्र धांडे या शेतकर्‍याची त्याच्याच शेतात असलेल्या सार्वजनिक मंदिरात हत्या करण्यात आलीये. धांडेंचा मृतदेह मंदिरात देवीच्या मूर्तीसमोर ठेवण्यात आला होता. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. त्यांचा गळा चिरलेला असून छातीवरही धारदार शस्त्रांचे वार आहेत. मृतदेहाजवळ एक इंजेक्शनही सापडलंय. तसंच बाजूलाच भाताचा नैवेद्यही ठेवलेला दिसला. हत्येच्या आधी धांडेंना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आलं असावं असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. हा प्रकार नरबळीचा असल्याची शंका व्यक्त होतीये, त्यामुळे गावात भीतीचं आणि तणावाचं वातावरण आहे.दरम्यान पोलिसांनी श्वानपथकाच्या सहाय्यानं मारेकर्‍यांचा शोध सुरू केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close