भारत-पाक चर्चा पुन्हा सुरू

July 16, 2009 4:28 PM0 commentsViews:

16 जुलै मुंबई हल्ल्यानंतर ठप्प झालेली भारत आणि पाकिस्तानमधली चर्चा प्रक्रिया पुन्हा रुळावर आली य. इजिप्तमध्ये झालेल्या बैठकीत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. चर्चेनंचतर दोन्ही देशांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात दहशतवाद हा भारत आणि पाकिस्तानचा समान शत्रू असल्याचं म्हटलंय. दोन्ही देशांच्या संयुक्त सहकार्यानं या शत्रूचा सामना करण्याचा निर्णय झाला. पण दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा प्रक्रिया अडणार नसल्याचं ठरवण्यात आलंय. भारताने दहशतवाद्याच्या मुद्द्याचा आग्रह सोडला असून पाकिस्तानने काश्मीर शिवाय चर्चा करायला तयारी दाखवली संबंध सुधारण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग असल्याचं दोन्ही देशांच्या नेत्यांनी मान्य केलं. बैठकीतले महत्वाचे मुद्दे : भारत आणि पाकिस्तानने चर्चा सुरू करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. पण चर्चा पुन्हा रुळावर आणण्यासाठी दोन्ही देशांनी आपापल्या भूमिका कशा मवाळ केल्या आहेत. हे दोन्ही देशांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात दिसून येतं.भारतानं काही पावलं मागं घेतली आहेत. पाकिस्तान दहशतवाद्यांवर काय कारवाई करणार. हा मुद्दा भारताने संयुक्त चर्चेपासून वेगळा केलाय. गुप्तचर संस्थामध्ये माहितीची देवाणघेवाण करायला भारतानं तयारी दाखवलीय. पाकिस्तानची ही जुनी मागणी होती.पाकिस्तानला बलुचिस्तानमधल्या फुटीरवाद्यांचा धोका आहे, याचा निवेदनात उल्लेख करायला भारत तयार झालाय. बलुची फुटीरवाद्यांना भारत मदत करतो, असा आरोप पाकिस्तानने केला होता.भारताप्रमाणेच पाकिस्ताननंही काही पावलं मागं घेतली आहेत. पहिल्यांदाच काश्मीरचा उल्लेख निवेदनात करण्यात आलेला नाही. संयुक्त चर्चेत काश्मीरचा मुद्दा हवाच, असा पाकिस्तानचा पूर्वी आग्रह असायचा.संयुक्त निवेदनात म्हणजेच भारत-पाक चर्चेत मुंबई हल्ल्याचा थेट उल्लेख करू द्यायला पाकिस्तान तयार आहे.लवकरच सुरू होणारी ही चर्चा केवळ दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्येच घेण्याचं ठरलंय. राजकीय नेत्यांमधल्या बैठकीचा कुठेच उल्लेख नाही.

close