‘गुगल ग्लास’ नेमकं आहे तरी काय…?

December 10, 2014 10:34 PM0 commentsViews:

10 डिसेंबर : चष्म्या सारखे दिसणारे ‘गुगल ग्लास’चे तंत्रज्ञान सध्या जगभरात गाजतंय. पण हे गुगल ग्लास नेमकं आहे तरी काय…याबद्दल अनेकांना उत्सुकताही आहे.

google glass 2या तंत्रज्ञानाचे नाव जरी गुगल ग्लास असं असलं तरी हे एक चष्म्यासारखं गॅजेट आहे. या चष्म्याच्या साईडला टॅप केलं की, ते सुरू होते आणि बंद होते आणि आपल्याला आपल्या हातातील स्मार्टफोनच्या स्क्रीनवर दिसणार्‍या गोष्टी समोर दिसू लागतात. आपण जसे ब्लू टूथ वापरून बोलू शकतो तसं या छोट्याशा गॅजेटचा वापर करून माहितीही ऍक्सेस करू शकतो. गुगल ग्लासवर दिसणार्‍या होम पेजच्या उजव्या बाजूला मेसेजेस, फोटोज्, व्हिडिओज् इ. दिसतात. ही सारी माहिती गुगल ग्लास घातलेल्या व्यक्तीलाच दिसू शकते. गुगल ग्लास घालून आपण फक्त पापण्यांची उघडझाप केली की फोटोही काढता येतो. हे फोटो आपण लगेच शेअरही करू शकतो. मात्र यामुळे हेरगिरी होऊ शकते. याचा गैरवापर होऊ शकतो,अशी भीती सगळ्यांना वाटतेय. आणि कदाचित त्यामुळेच भारतासारख्या देशात गुगल ग्लासला बंदी आहे. पण पुढेमागे हे तंत्रज्ञान आपल्याकडेही येऊ शकतं. आता या गुगल ग्लासची एकस्पोअर एडिशनही बाजारात आलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close