यश शहा हत्येप्रकरणी दोन आरोपी अटकेत

July 17, 2009 11:17 AM0 commentsViews:

17 जुलै डोंबिवलीमधील यश शहा अपहरण आणि हत्येप्रकरणी ठाणे क्राईम ब्रॅेचने 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. हे दोघेही आरोपी शहा कुटुंबियांच्या परिचयाचे आहेत. 14 वर्षांच्या यश शहाचं 25 जूनला शाळेत जाताना अपहरण झालं होते. त्याच्या सुटकेसाठी 20 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. पण 27 जूनला यशचा मृतदेह बदलापूर जवळील बारवी डॅम जवळ मिळाला होता. या नंतर पोलिसांच्या विरोधात अनेक निदर्शनं झाली होती. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव होता. आयबीएन लोकमतनेही हे प्रकरण लावून धरलं होतं.

close