आग्य्रात हिंदू धर्मात परिवर्तनावरून वादंग !

December 10, 2014 11:07 PM1 commentViews:

agra_234210 डिसेंबर : उत्तर प्रदेशात आग्रा इथं सुमारे 100 नागरिकांचं हिंदू धर्मात परिवर्तन करण्याच्या मुद्द्यावरून वादळ निर्माण झालंय. धर्म जागरण मंच या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनेनं काही मुस्लीम आणि ख्रिश्चन कुटुंबांचं हिंदू धर्मात परिवर्तन करण्याचा कार्यक्रम आखला असल्याचा आरोप होतोय.

लव्ह जिहादचं प्रकरण शमतं न शमतं आता आणखी एका वादाने डोकंवर काढलंय. उत्तर प्रदेशात आग्रा इथं 100 नागरिकांचं हिंदू धर्मात परिवर्तन करण्यात आल्यामुळे वादंग निर्माण झालाय. आग्रा पोलिसांनी धर्म जागरण मंच आणि या संघटनेचे उत्तर प्रदेशातले समन्वयक किशोर यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍यांना बीपीएल कार्ड्स आणि घरांसाठी जमीन देण्याचं आश्वासन देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. तर आपला हिंदू धर्मात प्रवेश केला जाणार आहे, हे माहित नव्हतं, असं धर्म जागरण मंचाच्या आग्रा इथल्या कॅम्पमध्ये आणले गेलेल्या काही मुस्लिम नागरिकांनी सांगितलंय. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केलीये, तर सरकारनं मात्र या प्रकरणात हात झटकले आहे.

दरम्यान, धर्म जागरण मंचाच्या या धर्मपरिवर्तनाच्या कार्यक्रमाचे संसदेतही तीव्र प्रतिसाद उमटले. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा आणि सभागृहात त्याचं खंडन करावं अशी मागणी राज्यसभेत करण्यात आली. राज्यसभेत बसप, डावे पक्ष, काँग्रेस, तृणमूल आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनीही मुद्दा लावून धरला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • dattatray jadhav

    अरे प्रधान मंत्र्यांना जनहिताची काही कामे करू देणार आहात कि नाही ?

close