शांतता चर्चा आणि दहशतवाद हे वेगळे मुद्दे – पंतप्रधान

July 17, 2009 2:47 PM0 commentsViews: 12

17 जुलै इजिप्तच्या नाम देशांच्या शिखर परिषदेहून परतलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आज संसदेत विरोधकांना तोंड द्यावं लागलं. पाकशी शांतता चर्चा पुन्हा सुरू केल्यावरून विरोधकांनी संसदेत चांगलाच गदारोळ घातला. मात्र, दहशतवादाचा मुद्दा आणि पाकिस्तानशी सुरू असलेली शांतता चर्चा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, त्या विरोधकांनी एकत्र आणू नयेत, असं आवाहन पंतप्रधानांनी राज्यसभेत केलं. 26/11 हल्ल्यातल्या आरोपींना शिक्षा झाल्यानंतरच पाकिस्तानशी सुरू असलेल्या शांतता चर्चेला खरा अर्थ येईल, असं पंतप्रधान यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं आहे.

close